पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यातच आता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, शिक्षक/प्रदर्शक आणि कनिष्ठ निवासी या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 46 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 64,551 ते 1,80,000 लाखांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असला तरी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे.
सदर मुलाखत ही 9, 23, 30 ऑगस्ट 2024 दरम्यान घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://bavmcpune.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.