पुणे : बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसीमध्ये मेगा भरती निघाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना कुठंही जाण्याची गरज नाही. संबंधित उमेदवार अगदी घरबसल्या अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 1846 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क’.
– एकूण रिक्त पदे : 1846 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, दहावी पास.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,500-रु. 81,900 (पे मॅट्रिक्स-M15).
– वयोमर्यादा : अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 21 सप्टेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024.