पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण ती मिळवण्यात अनेक अडचणी येत असतात. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
नगर विकास विभागात अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता यांसह इतर अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 77 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी 31 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संबंधित उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी प्रधान सचिव (न वि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई 32 या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://urban.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.