पुणे : महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्यात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवार घरबसल्या अर्ज करू शकणार आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागातील दहशतवाद विरोधी पथकात ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत विधी सल्लागार आणि कायदा अधिकारी ग्रेड-ए या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 7 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तर 21 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात विधी सल्लागार या पदासाठी 40 हजार रुपये तर कायदा अधिकारी ग्रेड ए या पदासाठी 35 हजार रुपये दरमहा पगार मिळू शकणार आहे. यामध्ये वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, 62 वय असणारी व्यक्तीदेखील अर्ज करू शकते.
संबंधित उमेदवार courtcell.ats@ mahapolice.gov.in या मेल आयडीवर अर्ज पाठवू शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.mahapolice.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.