पुणे प्राईम न्यूज: महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी) कडून “कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी, लघुलेखक, उद्यान पर्यवेक्षक, सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्र, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, वाहन चालक, स्वच्छक, शिपाई ” पदांच्या एकूण 2109 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 06 नोव्हेंबर 2023 या तारखे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारआवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात.
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत 14 संवर्गातील एकूण 2109 पदांसाठी सरळसेवा भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार आपले अर्ज दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते 06 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
भरती 2023 अधिसुचना- 14 ऑक्टोबर 2023
अर्ज सुरु होण्याची तारीख– 16 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख– 06 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याचे ठिकाण:
सार्वजनिक बांधकाम विभागातील भरतीमध्ये पात्र असेलेल्या पदासाठी http://mahapwd.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता.
भरती निवड प्रक्रिया
परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. Normalization साठीचे सूत्र संकेतस्थळावर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.
भरती अर्ज शुल्क
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज शुल्क खालील प्रमाणे-
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी : रु 1000 /-
मागासवर्गीय/आ.दृ.घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी: रु. 900/-
माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुक्ल आकारले जाणार नाही.
या भरती संदर्भात पात्रता, वयोमर्यादा यासारख्या विविध विषयांची माहिती व जाहिरात पाहण्यासाठी उमेदवार http://mahapwd.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.