पुणे : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर आता ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते. कारण, महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विकास महामंडळात अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. त्यानुसार, अर्जही मागवण्यात आले आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई येथे कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक, मत्स्यपालन निरीक्षक, चौकीदार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://fisheries.maharashtra.gov.in/en या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक, मत्स्यपालन निरीक्षक, चौकीदार.
– एकूण रिक्त पदे : 09 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई, नागपूर, नाशिक, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2024.