नवी दिल्ली : सरकारी नोकरीची संधी आता तुम्हाला मिळू शकणार आहे. कारण ‘न्यूक्लिअर फ्यूल कॉम्प्लेक्स’ अर्थात ‘एनएफसी’मध्ये मोठी भरती निघाली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये फिटर, टर्नर, लॅब असिस्टंट यांसारखे इतर पदे भरणार आहेत.
‘एनएफसी’मध्ये इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, मशिनिस्ट (ग्राइंडर), अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट), केमिकल प्लांट ऑपरेटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, लघुलेखक (इंग्रजी), संगणक चालक आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कारपेंटर, प्लंबर या पदांवर भरती केली जात आहे. योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता काय?
अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा. याशिवाय, ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
एकूण पदसंख्या – 206 पदे
नोकरीचे ठिकाण – हैदराबाद
वयोमर्यादा काय?
कमाल वयोमर्यादा : 38 वर्षे. तर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
– 30 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे.
अर्ज शुल्क किती?
या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज कुठं करावा?
अर्ज करण्यासाठी आणि या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.nfc.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे.