पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 23 पदे भरली जाणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर येथे फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, हृदयरोगतज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, दंत आरोग्यतज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आशा गट प्रवर्तक (महिलांसाठी राखीव) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2023 असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
उमेदवाराला पगारही चांगला मिळणार असून, 8,125 रुपये ते 1,25,000 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या पदांसाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली जी असून, 38 वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज शकणार आहेत. या पदासाठी भरती प्रक्रिया आजपासून म्हणजे 29, नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
कुठं पाठवावा अर्ज :
राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, दुसरा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर 416003.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://arogya.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.