Jobs News : नवी दिल्ली : बँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. कारण ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ने तब्बल 1000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 69810 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.(Jobs News)
1000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
व्यवस्थापक स्केल-II भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी 15 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येऊ शकणार आहे. त्यासाठी centerbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.(Jobs News)
जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा…
परीक्षेची संभाव्य तारीख ऑगस्टचा दुसरा किंवा तिसरा आठवडा म्हणून नमूद करण्यात आली आहे.
रिक्त पदांपैकी 405 पदे सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. तर 150 पदे SC, 75 ST, 270 OBC, 100 EWS प्रवर्गासाठी राखीव आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि CAIIB.
अनुभव – PSB / खाजगी क्षेत्रातील बँक / RRB मध्ये अधिकारी म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव. इतर तपशीलवार अनुभव संबंधित तपशीलांसाठी सूचना पाहावी.(Jobs News)
कमाल वयोमर्यादा : 32 वर्षे. 31 मे 2023 नुसार वयाची गणना केली जाईल. ओबीसी, एससी, एसटी यांनाही नियमानुसार सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया…
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे केली जाईल.
पगार किती?
48170 ते 69810 पर्यंत आणि इतर भत्ते.(Jobs News)