पुणे : पुण्यातील डेक्कन एजुकेशन सोसायटीमध्ये लवकरच काही प्राध्यापकांची भरती होणार आहे. सहाय्यक प्राध्यापकांच्या एकूण जागा ९६ जागा रिक्त आहेत. या पदासाठी भारती प्रक्रिया होणार आहे. यासाठी अधिसूचना २०२२ जारी करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह किंवा त्याच्या समतुल्य श्रेणीसह पदवी असणे आवश्यक आहे. (SC/ST प्रवर्गासाठी ५% गुणांपर्यंत सूट) उमेदवारांचा संपूर्ण कारकिर्दीत चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. NET/SET पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पात्रतेसंबंधी इतर सर्व अटी महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सरकारने विहित केलेल्या नियमांनुसार आहेत. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०२२ पर्यंत आहे.
आवश्यक कागदपत्रे
१) Resume (बायोडेटा)
२) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
३) पासपोर्ट साईझ फोटो
४)शाळा सोडल्याचा दाखला
५)दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
६)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
दरम्यान, उमेदवाराने अर्ज पुढील पत्यावर पाठवावे पत्ता : कॉलेज ऑफिस, इनवर्ड सेक्शन, मुख्य ऑफिस, फर्ग्युसन कॉलेज, पुणे : ४११००४.