पुणे : तुम्ही चांगली नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्न करत असाल तर आम्ही तुम्हाला एका नोकरीची माहिती देणार आहोत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत योग प्रशिक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी-चिंचवड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 33 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, 18-45 वर्षे असणे गरजेचे आहे.
शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण, योग प्रशिक्षक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. सदर मुलाखत ही 16 ऑक्टोबर 2024 रोजी नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकी समोर, थेरगाव पुणे-411 033 येथे घेतली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.