पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, ECHS पॉलीक्लिनिक बुलडाणा आणि जळगाव येथे नोकरीची संधी तुम्हाला मिळू शकते. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
बुलडाणा आणि जळगाव येथील ECHS पॉलीक्लिनिक येथे प्रभारी अधिकारी, दंत A/T/H, लॅब. टेक., फार्मासिस्ट, नूर. सहाय्यक, महिला परिचर, लिपिक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बुलडाणा किंवा जळगाव येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रभारी अधिकारी, दंत A/T/H, लॅब. टेक., फार्मासिस्ट, नूर. सहाय्यक, महिला परिचर, लिपिक.
– एकूण रिक्त पदे: 08 पदे.
– नोकरीचे ठिकाण : बुलडाणा आणि जळगाव.
– शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी विज्ञान, पदवीधर, जीएनएम डिप्लोमा, साक्षर, बी. फार्मसह उत्तीर्ण. किंवा डी. फार्म., बीएससी, डिप्लोमा.
– वेतन / मानधन : दरमहा 16,800/- ते 75,000 हजारांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024.