Job Alert: पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, श्रीगोंदा नगरपरिषदेत रिक्त पदासाठी भरती केली जात आहे. यामध्ये एकूण एक रिक्त पद भरले जाणार असून, यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे.
श्रीगोंदा नगरपरिषदेत सिव्हिल इंजिनिअर या पदासाठी भरती होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अहमदनगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. पात्र उमेदवाराची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार असून, यासाठी 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सिव्हिल इंजिनिअर / स्थापत्य अभियंता
– एकूण रिक्त पदे : एक पद
– वेतन / मानधन : दरमहा 35 हजार रुपये.
– शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर किंवा पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
– नोकरीचे ठिकाण : अहमदनगर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 21 नोव्हेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2023.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता / अर्ज सादर करण्याचा पत्ता : श्रीगोंदा नगरपरिषद, तालुका-श्रीगोंदा, जिल्हा-अहमदनगर.
– या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://ahmednagar.nic.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.