Job Alert: पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता पुणे महापालिकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला पुण्यात नोकरी करावी लागणार आहे.
पुणे महापालिकेत पशु वैद्यकीय अधिकारी (व्हेटरनरी ऑफिसर) या पदावर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत 14 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 43 वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पशु वैद्यकीय अधिकारी (व्हेटरनरी ऑफिसर).
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्रातील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी
– वयोमर्यादा : 43 वर्षे
– वेतन / मानधन : रु. 45,000/-
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 डिसेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे-०५.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.pmc.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.