पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’मध्ये विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’मध्ये तंत्रज्ञ ग्रा. II, उपव्यवस्थापक (तांत्रिक), प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) आणि पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 81 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : तंत्रज्ञ ग्रा. II, उपव्यवस्थापक (तांत्रिक), प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) आणि पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET).
– एकूण रिक्त पदे : 81 पदे.
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
– शैक्षणिक पात्रता : दहावी, पदवी, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट इ.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 20,480/- ते रु. 1,40,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 27 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 23 मार्च 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.ecil.co.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.