पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. मुंबईतील अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
मुंबईतील अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन येथे वैज्ञानिक अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार असून, या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
मुलाखतीसाठी अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन, तिसरा मजला, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- 410210 येथे जावं लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.actrec.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैज्ञानिक अधिकारी.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वयोमर्यादा : 30 वर्षे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 30,000/- ते रु. 40,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 04 नोव्हेंबर 2024