पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता भारत सरकारच्या भारतीय मानक ब्यूरो या विभागात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘भारतीय मानक ब्यूरो’ विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एमई) हे पद आता भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 20 जुलैपासून म्हणजे आजपासून अर्ज करण्याला सुरुवात झाली आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 45 वर्षे अशी ही वयोमर्यादा असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एमई).
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.
– वयोमर्यादा : 45 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 जुलै 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://bis.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.