पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रियेला आता सुरुवात झाली असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1.32 लाखापर्यंत पगार मिळू शकणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात उच्च श्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लिपीक टंकलेखक या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
यासाठी 03 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, 20 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://scea.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : उच्च श्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लिपीक टंकलेखक.
– एकूण रिक्त पदे : 08 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा 19,900/- ते 1,32,300/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 03 जुलै 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे ४११००१.