पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, सोलापूर जिल्हा न्यायालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सोलापूर जिल्हा न्यायालयात कंत्राटी कर्मचारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://solapur.dcourts.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कंत्राटी कर्मचारी.
– नोकरीचे ठिकाण : सोलापूर.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, GCC-TBC किंवा ITI मध्ये प्रमाणपत्र.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 15,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 18 -43 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 02 एप्रिल 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 एप्रिल 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, सोलापूर, सिव्हिल लाईन्स, वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयासमोर, रंगभवन, सोलापूर.