पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात लॅब टेक्निशियन हेल्थ, मेडीकल रेकॉर्ड टेक्निशियन, ड्रेसर, नर्सिंग ऑर्डरली या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 4 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार असून, पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लॅब टेक्निशियन हेल्थ, मेडीकल रेकॉर्ड टेक्निशियन, ड्रेसर, नर्सिंग ऑर्डरली.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– वयोमर्यादा : 18 – 45 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 27 जून 2024.
– मुलाखतीचा पत्ता : आरोग्य केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.unishivaji.ac.in/ वरून माहिती घेता येणार आहे.