पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यातील विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवारही यामध्ये अर्ज करू शकणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक (पुरुष) या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात 38 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दहा हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : बहुउद्देशीय व्यावसायिक प्रशिक्षक (पुरुष).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी.
– शैक्षणिक पात्रता : दहावी पास, आय.टी.आय.
– वेतन / मानधन : दरमहा 10,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 21-38 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ratnagiri.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.