पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला रत्नागिरी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत वैधानिक लेखापरीक्षक या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 5 जूनपासून सुरुवात झाली असून, 11 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैधानिक लेखापरीक्षक.
– नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 05 जून 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो) रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.zpratnagiri.org/ वरून माहिती घेता येणार आहे.