पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता तुम्हाला पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. कारण, पुणे जिल्हा परिषदेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त (गट-अ) अभियांत्रिकी समन्वयक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद पुणे, यशवंतराव चव्हाण भवन, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, वेलस्ली रोड, SGS मॉल समोर, पुणे-1 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सेवानिवृत्त (गट-अ) अभियांत्रिकी समन्वयक.
– संवर्ग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण / जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 5400.
– वयोमर्यादा : 58 ते 65 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 (सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत).
– मुलाखतीची तारीख : 19 सप्टेंबर 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://punezp.mkcl.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.