पुणे : पुणे पोलिस दलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेत 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
पुणे पोलिस दलात अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब आणि विधी अधिकारी या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://punepolice.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब आणि विधी अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 10 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.