पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण आता परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक (महिला) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला परभणी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 15 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असला तरी यासाठी 2 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी या पत्त्यावर पाठवावा.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://parbhani.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.