पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागात उप महाव्यवस्थापक (प्रशासन), उप महाव्यवस्थापक (कायदेशीर), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) आणि व्यवस्थापक (तांत्रिक) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 63 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : उप महाव्यवस्थापक (प्रशासन), उप महाव्यवस्थापक (कायदेशीर), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) आणि व्यवस्थापक (तांत्रिक).
– एकूण रिक्त पदे : 63 पदे.
– शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणतीही पदवी, कायद्यातील पदवी, स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://nhai.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.