पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा शोध सुरु असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. त्यात आता नाशिकच्या जिल्हा परिषदेत येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
नाशिक जिल्हा परिषदेत उपअभियंता (स्थापत्य) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण केवळ एक रिक्त पद भरले जाणार आहे.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असल्याने त्यासाठी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जिल्हा परिषद, नाशिक ४२२००१ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : उपअभियंता (स्थापत्य).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑक्टोबर 2024.