पुणे : नागपुरातील ‘सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट’ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये पात्र उमेदवाराची थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 30 हजार रुपये पगार मिळणार आहे.
‘सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट’ नागपूर येथे रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत यंग प्रोफेशनल-I या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 25 जून 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-I.
– एकूण रिक्त पद : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.
– वेतन / मानधन : दरमहा 30,000 रुपये
– वयोमर्यादा : 21-45 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट).
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 25 जून 2024.
– मुलाखतीचा पत्ता : ICAR Central Citrus Research Institute समोर. NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, जवळ विद्यापीठ परिसर, वाडीपूर्वी, अमरावती रोड, नागपूर.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
http://www.ccringp.org.in/ वरून माहिती घेता येणार आहे.