पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा), सहाय्यक महाव्यवस्थापक (RS), सहाय्यक व्यवस्थापक (PR), सहाय्यक व्यवस्थापक (अग्निशामक), उप अभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (E&M) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mmrcl.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा), सहाय्यक महाव्यवस्थापक (RS), सहाय्यक व्यवस्थापक (PR), सहाय्यक व्यवस्थापक (अग्निशामक), उप अभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (E&M), अग्निशमन निरीक्षक, कनिष्ठ अभियंता – II ( सिव्हिल) आणि वरिष्ठ सहाय्यक (एचआर).
– शैक्षणिक पात्रता : बॅचलर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स, मास मीडिया/जर्नालिझम/मास कम्युनिकेशन, बीएससी, सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा, पीएमआयआर / आयआरपीएम / एलएसडब्ल्यू / एमएसडब्ल्यू / एचआरएममध्ये पदवीधर पदवी.
– एकूण रिक्त पदे : 09 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 34,020/- ते रु. 2,00,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024.