पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण विभागात शिकाऊ (इलेक्ट्रिशियन) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी-चिंचवड, पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 23 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahatransco.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शिकाऊ (इलेक्ट्रिशियन).
– एकूण रिक्त पदे : 23 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे.
– शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये उत्तीर्ण, एनसीटीव्हीटी, आयटीआय.
– वयोमर्यादा : 18-30 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट).
– आस्थापनेचा रजिस्ट्रेशन क्रमांक : E10202700049
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म. रा. वि. पारेषण कंपनी लिमिटेडचे कार्यालय, ए. डी. सावसू विभाग, पिंपरी चिंचवड.