पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र ग्राम विकास विभागात रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र ग्राम विकास विभागात उपअभियंता या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : उपअभियंता.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा डिप्लोमा.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वयोमर्यादा : 65 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 18 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता कार्यालय, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था, सार्वजनिक बांधकाम संकुल, लेडीज क्लॅब चौक, सिव्हिल लाईन, नागपूर- 440001.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.rdd.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.