पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र कर्मचारी राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी (गट अ) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 19 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (गट अ).
– एकूण रिक्त पदे : 19 पदे.
– नोकरीचे ठिकाण : ठाणे.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 30 जुलै 2024.
– मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी MH-ESI सोसायटी, वागळे इस्टेट, रस्ता क्रमांक 33, ठाणे- 400604.