पुणे : सरकारी विभागात नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, स्पर्धा परीक्षा असो वा इतर परीक्षांच्या माध्यमातून नोकरीचा प्रयत्न केला जातो. पण आता तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र शासनाच्या विभागात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, संबंधित विभागाकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथे डॉक्टर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पदासाठी बी.व्ही. एससी. अँड ए.एच./एम.व्ही. अनुसूचित जाती क्लिनिकल असणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, सदर मुलाखत ही 15 ऑक्टोबर 2024 रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी असोसिएट डीन ऑफिसच्या शेजारील कॉन्फरन्स हॉल, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई – 400012 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.mafsu.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.