पुणे : सरकारी विभागात नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, स्पर्धा परीक्षा असो वा इतर परीक्षांच्या माध्यमातून नोकरीचा प्रयत्न केला जातो. पण आता तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्याच्या वन विभागात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, संबंधित विभागाकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अमरावती येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदासाठी पदवीधर असणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 45 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर.
– एकूण रिक्त पदे : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : अमरावती.
– शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी.
– वेतन/ मानधन : दरमहा रु. 45,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 27 सप्टेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा – 444805
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : dvcfwlsipna@mahaforest.gov.in
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 23 ऑक्टोबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा – 444805.