पुणे : चांगल्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला ज्या विभागात भरती निघाली त्याची माहिती देणार आहोत. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा. कोल्हापूरच्या वन विभागात ही संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
कोल्हापूरच्या वन विभागात विधी सल्लागार या पदावर भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्ते पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये पात्रता देखील ठरवण्यात आली आहे. उमेदवारांना विधी विषयक कामकाजाचा अनुभव आहे, अशा सेवानिवृत्त अधिकारी/सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश/अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश/सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असावा. त्यामुळे इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी/न्यायाधीश यांनीच अर्ज करावेत, असेही सांगण्यात आले आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विधी सल्लागार.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क , कोल्हापूर – ४१६००३.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.