पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आता तुम्हाला पुण्यातील एका केंद्रीय विद्यालयात नोकरी मिळू शकते. त्यानुसार, आता रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यासाठी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. याच मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करावा.
केंद्रीय विद्यालय दक्षिणी कमांड, पुणे येथे ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात समुपदेशक, संगणक प्रशिक्षक, पीजीटी जीवशास्त्र यांसारखी रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. पण, यासाठी मुलाखत द्यावी लागणार आहे. ही मुलाखत पंतप्रधान श्री के. व्ही. दक्षिणी कमांड, पुणे (मुंबई क्षेत्र), 03 लेफ्टनंट कर्नल तारापोर रोड, सब एरिया कॅन्टिनजवळ, सीएएमपी, पुणे – 411001 घेतली जाणार आहे.
जाणून घ्या भरती प्रक्रियेबाबत अधिक…
– पदाचे नाव : समुपदेशक, संगणक प्रशिक्षक, पीजीटी जीवशास्त्र.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : बीए/बीएस्सी, डिप्लोमा, बी.ई किंवा बी.टेक. किंवा एम.एस्सी. / एमसीए किंवा बी.एस्सी. / बीसीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएट, बी.एड.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 29 नोव्हेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : पंतप्रधान श्री के.व्ही. दक्षिणी कमांड पुणे मुंबई क्षेत्र, 03 लेफ्टनंट कर्नल तारापोर रोड, सब एरिया कॅन्टीन जवळ, सीएएमपी, पुणे, महाराष्ट्र पिन -411001.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://scpune.kvs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.