पुणे : नागपुरातील शासकीय निवासी शाळेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
शासकीय निवासी शाळा, नागपूर येथे शिक्षक या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी 24 सप्टेंबर रोजी मुलाखत घेतली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शिक्षक.
– एकूण रिक्त पदे : 10 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : बी.ए. / एम्.ए./ बी.एड., बी. एससी. / एम.एस्सी. बी.एड. / डी.एड, कला मध्ये बॅचलर किंवा मास्टर डिग्री / ए.टी.डी., एम.ए. संगीत, एम. एससी. संगणक विज्ञानमध्ये
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 24 सप्टेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रध्दानंदपेठ, बी विंग पहिला मजला, नागपूर.