पुणे : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यात पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक, अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नांदेड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 11 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 11 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नांदेड.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नादेड.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 15 ऑक्टोबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी नांदेड.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.drscgmcnanded.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.