पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये क्राफ्ट डायरेक्टर इलेक्ट्रीशियन, क्राफ्ट डायरेक्टर कोपा, क्राफ्ट डायरेक्टर वेल्डर, क्राफ्ट डायरेक्टर फिटर, स्कल्पचर डायरेक्टर वायरमन, क्राफ्ट डायरेक्टर मेकॅनिक मोटर व्हेईकल या पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : क्राफ्ट गाइड कॉस्मेटोलॉजी, डायरेक्टर इंजि. गणित आणि चित्रकला, संचालक रोजगार कौशल्य आणि वरिष्ठ लिपिक.
– एकूण रिक्त पदे : 12 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– शैक्षणिक पात्रता : पदवी/डिप्लोमा किंवा आयटीआय, एमबीए/बीबीए/ पदवीधर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 16 जुलै 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2024.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था. मोची कॉर्नर मालेगाव जि. नाशिक.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 30 जुलै 2024 सकाळी 11:00 वाजता.
– मुलाखतीचा पत्ता : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालेगाव, कॅम्परोड, ता. मालेगाव, जि. नाशिक