पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कर्मचारी राज्य विमा निगम, पुणे येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कर्मचारी राज्य विमा निगम, पुणे येथे ज्येष्ठ रहिवासी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्येष्ठ रहिवासी.
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. संबंधित स्पेशॅलिटीमध्ये पीजी पदवी किंवा समतुल्य / पीजी डिप्लोमा.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 67,700 ते रु.1,40,139 पर्यंत.
– वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 15 मे 2024.
– मुलाखतीचा पत्ता : ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे – 411 037.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://ww.esic.nic.in/ वरून माहिती घेता येणार आहे.