पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांचे कार्यालय राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात विशेषज्ञ, कनिष्ठ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी आणि योग प्रशिक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1,29,000 पर्यंत पगार मिळू शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विशेषज्ञ, कनिष्ठ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी आणि योग प्रशिक्षक.
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : योग प्रशिक्षक प्रमाणित, बी.ए.एमए.एस., एम.बी.बी.एस. पी.जी. सह पदवी, एम.डी. किंवा डीएनबी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 32,000/- ते रु.1,29,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 12 ऑगस्ट 2024.
– मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई- 400018