पुणे : कोर्टात तुमचं नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण, लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकणार आहे.
लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पुस्तक बांधणीकार या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात 38 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पुस्तक बांधणीकार.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : लातूर.
– वयोमर्यादा : 18-38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षांची सूट).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://latur.dcourts.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.