पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’ येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’ येथे सचिव या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 1 रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सचिव.
– एकूण रिक्त पद : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 15,600/- तेरु.39,100/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 45 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 24 एप्रिल 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मे 2024.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, दुसरा मजला, हायकोर्ट एक्स्टेंशन, फोर्ट, मुंबई- 400032.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.barcouncilmahgoa.org/ वरून माहिती घेता येणार आहे.