पुणे : अमरावती येथील जिल्हा परिषदेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद, अमरावती येथे लिपिक (जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अमरावती येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 15,000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zpamravati.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लिपिक (जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अमरावती.
– वेतन / मानधन : दरमहा 15,000 रुपये
– वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 09 डिसेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष, कर्मचारी कल्याण निधी, जिल्हा परिषद, अमरावती.