पुणे : सध्या चांगलं शिक्षण घेऊनही अनेकांना नोकरीची प्रतिक्षाच करावी लागते. पण आता तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे फायरमन आणि सब ऑफिसर (फायर) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : फायरमन आणि सब ऑफिसर (फायर).
– नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 23,800/- ते रु.40,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 10 एप्रिल 2024.
– मुलाखतीचा पत्ता : टाटा मेमोरियल सेंटर, तिसरा मजला, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- 410210.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://tmc.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.