पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला ज्या विभागात भरती निघाली त्याची माहिती देणार आहोत. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यामध्ये थेट मुलाखतीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर येथे रिक्त पदावर भरती केली जाणार आहे. या विभागात प्रशासकीय सहाय्यक (बहु कुशल) ही पदे भरली जाणार आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रशासकीय सहाय्यक (बहु कुशल).
– नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, टायपिंगचा चांगला स्पीड, एमएस ऑफिस आणि संगणकाचे ज्ञान.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 24,700/- ते रु. 35,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 20 सप्टेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : तिसरा मजला, पेमास्टर शोधिका, TMC-ACTREC, से.-22, खारघर, नवी मुंबई- 410210
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.