पुणे : तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे नोकरीची उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे जीएसटी लेखापरीक्षक या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 ही असणार आहे. यामध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या प्रकियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : व्यावसायिक थेरपिस्ट.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : व्यावसायिक थेरपीमध्ये बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 21,100/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 13 नोव्हेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : एच.आर.डी. विभाग, प्रकल्प विभाग, चौथा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, पॅरेल, मुंबई – 400012.