पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण, तुम्हाला आता मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे नोकरी मिळू शकते. कारण, या ठिकाणी रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
नेहरू सायन्स सेंटर, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. प्रशिक्षणार्थी (क्राफ्ट), सुतारकाम, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि ए/सी, फिटर, वेल्डर, पेंटर, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग यांसारख्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (क्राफ्ट), सुतारकाम, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि ए/सी, फिटर, वेल्डर, पेंटर, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग.
– रिक्त पदे : 10 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन/ मानधन : दरमहा रु. 22,000/-.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : लेखी/व्यापार चाचणी.
– लेखी/व्यापार चाचणीची तारीख : 17 आणि 19 डिसेंबर 2024.
– लेखी/व्यापार चाचणीचा पत्ता : नेहरू विज्ञान केंद्र, (नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स) डॉ. ई. मोझेस रोड, वरळी, मुंबई-400 018.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://nehrusciencecentre.gov.in/या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.