पुणे : पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी’ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या ठिकाणी अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी’, पुणे येथे शिकाऊ या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात आयटीआय असणे गरजेचे आहे. ही पात्रता असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यासाठी 30 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु. 8,685/- ते रु. 9,770/- पर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकियेंतर्गत एकूण 31 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.icmr.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.