पुणे : नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी’ येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (ई अँड एम), ऑडिओ-व्हिडिओ ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (ई अँड एम), ऑडिओ-व्हिडिओ ऑपरेटर, एचव्हीएसी सेवा ऑपरेटर, सीवरेज व्यवस्थापन व्यक्ती, मीडिया सल्लागार, आयटी सल्लागार आणि डोमेन तज्ञ.
– एकूण रिक्त पदे : 12 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे
– वेतन/ मानधन : दरमहा रु. 20,000/- ते रु.75,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 27 मे आणि 3 जून 2024.
– मुलाखतीचा पत्ता : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, बापू भवन, रमाबाई आंबेडकर रोड, पुणे-411001.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
https://www.ninpune.ayush.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.